

Mercury Venus Moon consciousness
esakal
बुध आणि शुक्र हे ग्रह रवी आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेले अंतर्ग्रह म्हणून संबोधले जातात. पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र हासुद्धा वरील बुध आणि शुक्र या जणू सवंगड्यांबरोबर खेळणारा अंतर्ग्रहच समजला जातो. मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या योगातून म्हणा किंवा आकर्षणातून म्हणा, मन किंवा चित्त विशिष्ट वृत्तीशी जवळीक साधून असते किंवा ती तशी साधते. बुध आणि शुक्र हे ग्रह रवीपासून लांब किंवा जवळ जात, जणू आपले खेळ सादर करत असतात. तशीच पृथ्वीसुद्धा रवीपासून लांब किंवा जवळ जात आपला आविष्कार दाखवत, चंद्राला जवळ किंवा लांब करत असते आणि या आपल्या चंद्रबाळाला बुध आणि शुक्र या आपल्या सोसायटीतील या त्याच्या सवंगड्यांपाशी काही काळ खेळण्यासाठी अंगणात पाठवते. एकूणच चंद्र, बुध आणि शुक्र हे तीन अंतर्ग्रह माणसाच्या अंतःकरणाशीच निगडित आहेत. अर्थातच हे तीन ग्रह माणसाच्या विशिष्ट प्रवृत्तीचेच पालनपोषण करत असतात. जणू ते आपल्या घराच्या खिडकीतून डोकावत किंवा इशारे करत आपल्या चित्तप्रवृत्तीला वाट करून देत शिट्ट्या मारत असतात!