Premium|Milind Shinde Dada Holkar journey : दादा होळकरपासून मार्लन ब्रँडोपर्यंतचा प्रवास; मिलिंद शिंदेंनी घडवलेला खलनायकी अभिनयाचा नवा मापदंड

Marathi Villain Character : दादा होळकर हे पात्र साकारताना मिलिंद शिंदे यांनी संवादांपलीकडे देहबोली, हावभाव आणि न बोललेल्या भावनांवर भर दिला. शशांक सोळंकी आणि चिन्मय मांडलेकर यांच्या कल्पनेतून पात्र आकाराला आले.
Milind Shinde Dada Holkar journey

Milind Shinde Dada Holkar journey

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

‘‘आम्ही सांगतो, खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या नवीन नटमंडळींना, मिलिंद शिंदेंनी ‘जसं तू तिथं मी’ मालिकेत दादा होळकर (काही लोक त्याला तांबडे बाबा म्हणतात) जसा रंगवला होता ना तसा काठीया ---- बिलन तुम्हाला करायचा आहे.’’ हे वाक्य ऐकलं की सर्वांत आधी नजरेसमोर दोन नावं येतात एक शशांक सोळंकी दुसरा चिन्मय मांडलेकर. या दोघांच्या कल्पनेतून हे पात्र तयार झालं. मालिका सुरू होऊन चारपाच महिने झाले होते. दोनतीन वेगळ्या पात्रांसाठी माझं नाव येत होतं. काही कारणांनी ते घडून येत नव्हतं. अचानक एक दिवस शशांक सोळंकीचा फोन आला. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे शशांक सोळंकीकडून एखाद्या पात्राचं नॅरेशन ऐकायचं. तो ते सांगतो त्यात निम्म तुमच्या हातात आलेलं असतं. माझा जो काही थोडासा अनुभव आहे या क्षेत्रातला, मला एक ‘खोड’ आहे. नेहमी दिग्दर्शकाकडून स्टोरी ऐकायची. तो जे सांगतो त्या वेळेस त्याचं हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचं सांगण्याचं कसब यात बरंच काही समजतं. अगदी याला हा सिनेमा करता येईल की नाही... हे सुद्धा समजतं किंवा याची स्टोरी याला समजली आहे का याचा साधारण अंदाज येतो.

तर शशांक सोळंकी नखशिखांत पात्र तुमच्या समोर उभं करण्यात माहीर. सोबत तो काही संदर्भही सुचवतो. उदाहरणं देतो त्यातून ते पात्र तुमच्यासमोर उभं राहतं किंवा शशांक ते उभं करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com