आमदार साहेब,तिकडे नागपूरला आमदारांची पाण्याची गैरसोय झालीऐकून वाईट वाटलं...दहा दिवसांत एकदा पाणी येतं आमच्याकडे म्हणून काय तुम्हाला पण पाणी मिळू नये?.तुम्ही तर साहेब...एवढ्या थंडीत विधानसभेत जावं लागतंचांगले कोट घालत जाआम्ही समजू शकतो, थंडीत बोलणं अवघड जातंदात कडकड वाजतात एकमेकांवर आदळूनम्हणून तुम्ही शांत असतापहिल्यापासून तसे तुम्ही शांतकुणाच्या अध्यात नाही - मध्यात नाहीमुंबईत मराठी माणूस मार खातोय;.पण तुम्ही खासदाराला मारहाण झालीत्यावर बोलला ते बाकी बरं झालंबरं विरोधक म्हणतात, आम्हाला मारलं...सत्ताधारी म्हणतात, आम्हाला मारलं;पण व्हिडिओ आला नाही,म्हणून जनतेला मजा आली नाहीबाकी तुम्ही पण जरा जपून राहा.तुम्ही काहीच करीत नाही, असं नाहीआम्ही बघतो तुम्हाला बाक वाजवतानाथंडीत बरं वाटतं बाक वाजवूनकाही दिवस कांदा कसा विकायचा?आमचं मन आम्हाला खात राहीलतुम्ही मात्र तुम्हाला कोणतं खातं किंवापद मिळतंय ते बघा....तुम्ही केवढे कार्यक्षम!तुम्ही एवढ्या धावपळीत स्वतःचे फोटो टाकत असताआमच्यासाठी...केवढी काळजी आहे तुम्हालाइकडे लोक रस्त्यावर एकमेकांना मारताततुम्ही विधानसभेत कसे छान एकमेकांना टोमणे मारतातसं लोकांनी वागायला नको?.कितीही महत्त्वाचा प्रश्न आला तरीहसून फिरकी घ्यायचीटाळी द्यायची आणि छान सगळं विसरून जायचंएवढ्या खेळीमेळीने वागता तुम्ही...विरोधातले विरोधात आहेत का?हे पण कळत नाही कधी कधीत्यातले काही तरलग्नाचं आमंत्रण नसताना.पंगतीची वाट बघत बसलेले दिसतात कायम...तर काही कायम मला तुमच्यात खेळायला घ्या नाअसा चेहरा करून बसलेलेबहुतेक वेळा मधल्या सुट्टीत वाटावाटी करीतएकत्र डबे खाणाऱ्या मुलासारखे असता तुम्ही सभागृहातमंत्रिपद न मिळालेले दिसतात काही दिवस.ब्रेकअप झाल्यासारखेआपल्या मतदारांना दोन मिनिटंही न बोलणारेविधानसभेत ‘मला तीन मिनिटं बोलू द्या’ म्हणतातछान वाटतंअधूनमधून तुम्हाला भवनाच्या पायरीवर बसावं लागतं,तेव्हा जीव तुटतो आमचापण एकाने सांगितलं,.थंडीत बसून आखडून जातात सगळेमग जरा उन्हात बसून आंदोलन करायला सांगतो पक्षहेही उत्तम आहे...महिना महिना आमच्या कामाचं बोलत नाही तुम्हीमग लक्षात आलं,घोषणा देऊन देऊनच घसा दुखत असेल तुमचातरी काही आमदार पोटतिडकीने बोलतातएक अधिकारी म्हणाले होते,.सगळेच अधिकारी पैसे खात नाहीत... काही लोक मनालाही खातातराजकारणात पण असेल का हो तसं?असो...एकूण थंडी बघताशेकोटी तरी पेटवली पाहिजे.शेकत शेकत ईव्हीएमवर गप्पा होतीलदुपारी संत्री सोलतकुणी कुणाला कसं पाडलं बोलता येईलबाकी काही आमदार लोकांच्या प्रश्नावर बोलतातसत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालूनविरोधात असून, सत्तेत असूनपरग्रहावरचे वाटतात.तुम्ही कानाडोळा कराखूपच बोलायची हुक्की आलीतर खुशाल मोबाईल बघत बसातरीही चुकूनमराठी माणसाला मारहाण झाली,मराठी माणसाला घर नाकारलं,.मराठी माणसाला नोकरी नाकारली,बीडला संतोष देशमुखचा खून झाला,परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीत वारला,वीज महागली,बेरोजगारी वाढली.अशा अनेक बातम्या दिसतीलतुम्ही मोबाईल बंद कराएकाही समस्येवर जाब विचारू नकाउलट आरसा बघाआरशात जो दिसतोय त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघापक्षाची चिंता करू नका,.नेत्याची भीती बाळगू नकाआरशात दिसतोय त्याला तुम्ही बिनधास्तजाब विचारू शकताकधीही...कुणाला कळणार नाही तुम्ही जाब विचारलाय.पण तुम्हाला कळेल एकट्यात का होईनास्वतःला का असेनाजाब विचारला पाहिजेमाणूस गेला हे बातमी पाहून कळतंमाणुसकी उरलीय हे स्वतःकडे पाहून कळतंएकदा ज्याचं मत विकत घेतलं नाही,ज्याला काही आश्वासन दिलं नाही.अशा आरशातल्या माणसाला प्रश्न विचारा साहेबएक प्रश्नोत्तराचा तास असाही होऊ द्याआमदारांचा भाव गल्लीतलं पोरगं सांगतं आताआता आमदाराच्या भावना कळू द्या!(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.