marathi language issue
sakal
- प्रियदर्शन, saptrang@esakal.com
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी भाषेला राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या आठवड्यात अंधेरी मेट्रो स्टेशनवरील वेगवेगळ्या गेटवर लिहिलेल्या इंग्रजी आणि हिंदीमधील नावाच्या पाट्यांवर काळा रंग फासण्यात आला. त्यांची तक्रार होती, की यात मराठी का नाही? पण हिंदी आणि मराठीची लिपी तर एकच आहे, दोन्ही देवनागरीत वाचता येतात. कदाचित याच कारणामुळे मेट्रो प्रशासनाने तिसऱ्या भाषेचा वापर टाळला असावा.