
सम्राट कदम - editor@esakal.com
मोबाईल हातात नसल्यावर अस्वस्थ वाटते? झोपताना आणि झोपेतून उठल्यावर मोबाईलशिवाय होत नाही? स्क्रीन कितीही ‘स्क्रोल’ केली तरी समाधान होत नाही?... तर तुम्ही नक्कीच मोबाईलच्या विळख्यात अडकला आहात. अमली पदार्थांपेक्षाही भयानक असलेल्या या व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ हे तुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या लेखकद्वयीने लिहिलेले पुस्तक नक्की वाचा! हे पुस्तक जणू एखाद्या ‘चॅटबॉट’प्रमाणे प्रश्नांची थेट उत्तरे देते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असलेली स्वयंमूल्यांकन चाचणी आणि १५ दिवसांचा कृती आराखडा या पुस्तकाचे वेगळेपण सिद्ध करतो.