

Theatre History
esakal
आशुतोष पोतदार - नाटक : जिवंत लोकशाहीचं रूप
जगभरातल्या नाटकाचा इतिहास पाहिला, तर लिखित साहित्य प्रस्थापित होण्याआधीच नाटक सादरीकरणाचं रूप म्हणून मान्यता पावलेलं आहे. मुळात नाटक हे समूहाचं आणि समाजाचं राहिलेलं आहे. नाटकातील निर्मिती-व्यवस्थेत कोण महत्त्वाचा यात सत्ताकारण असू शकतं.
ना टक कुणाचं असतं?... नाटककाराचं की दिग्दर्शकाचं?... प्रकाशयोजना, संगीत आणि नेपथ्य यांची सर्जनशील मांडणी करणाऱ्या तंत्रज्ञांचं... की कला आणि व्यवहार यांची सांगड घालणाऱ्या व्यवस्थापकाचं?... वरवर साधे वाटणारे हे प्रश्न प्रत्यक्षात अत्यंत गुंतागुंतीचे असतात. यामागचं कारण म्हणजे नाट्यनिर्मिती प्रक्रियेतील व्यामिश्रता. साहित्य आणि सादरीकरण या व्यापक अवकाशातला नाटकाचा खेळ हा बहुआयामी असतो. सामान्यतः असं मानलं जातं की, नाटक सुरू होतं ते नाटककाराच्या लिखित शब्दांनी, किंवा प्रयोगाचा पडदा उघडला की दिसतं ते नाटक. पण, यांच्या आगेमागे घडतं ते बहुअंगी असतं. नाट्यलेखन आणि वाचन, कलाकार, रिहर्सल्स, रंगमंचीय मांडणी, प्रयोगासाठीची जागा, आर्थिक नियोजन आणि ठिकठिकाणचे प्रयोग अशा विविध क्रिया-प्रक्रियांतून तावून-सुलाखून निघत नाटक उभं राहतं. शब्द-संहिता, आंगिक रूपं, अवकाश आणि प्रेक्षक यांच्यातील परस्पर संबंधांतून हा खेळ उभा राहतो.