#MokaleVha : ज्येष्ठांमधील बायपोलर डिसऑर्डर

Mokale-Vha
Mokale-Vha

ज्येष्ठांमधील बायपोलर डिसऑर्डर
बायपोलर डिसऑर्डरला मॅनिक डिप्रेशन असेही म्हटले जाते. ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मूड बदलत असतात. वृद्ध व्यक्ती ह्रदयाचे आजार, किडणीचे आजार, फुफुसांचे आजार अशा अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना सामोरे जात असतात. त्यामुळे त्यांचे मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केले जाते. वृद्धांना इतरांप्रमाणे मानसिक आजार होण्याची शक्यता असते. बायपोलर डिसऑर्डर हा त्यापैकीच एक आहे. साधारणपणे आनंदी भावनेत असताना ते कौटुंबिक कार्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात. पण तेच त्यांचा मूड बदलून दुखी झाल्यास, ते अलिप्त, दुखी राहतात किंवा चिडचिड करतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मूड बदलण्यामुळे त्यांच्या स्वभावावर, झोपेवर, नात्यांवर परिणाम होतो. तरुणांच्या तुलनेत वृद्धांना या आजारापासून सुटका करून घेण्यास खूप कठीण असते. बायपोलर डिसऑर्डर असणाऱ्या वृद्धांना सांभाळणे हे त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठीही तेवढेच आव्हानात्मक असते. गोंधळ उडणे, मूड बदलणे, चिडचिड करणे, निर्णय घेताना अडचण येणे ही याची लक्षणे आहेत. ज्येष्ठ नागरिक अनेक शारीरिक व्याधींचा सामना करत असतात, त्याचबरोबर असणाऱ्या मानसिक आरोग्याच्या आजारांमुळे ही समस्या आणखी वाढू शकते. यावर उपचार करून घेण्यासाठी मनोचिकित्सकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

नैराश्‍याची कारणे
वृद्धांमध्ये असणाऱ्या मानसिक आजारांपैकी नैराश्‍य ही एक महत्त्वाची समस्या आहे, कारण ते आयुष्याच्या विविध टप्प्यातून गेलेले असतात. त्यांपैकी जास्त क्लेशकारक घटना म्हणजे जोडीदाराचा मृत्यू होणे. बऱ्याचवेळा मुले दुसऱ्या राज्यात किंवा देशात त्यांचे बस्तान बसवतात. आपल्या पालकांशी बोलण्यासाठी किंवा भेटण्यासाठी त्यांना वेळही काढत येत नाही. काही नात्यांमध्ये हे परदेशी किंवा परराज्यात स्थायिक होणे कायमस्वरूपी असते.

ही मुले आपल्या पालकांना सोबत घेऊन जाण्यासही नकार देतात. काम करणाऱ्या लोकांना सेवानिवृत्ती घेणे आणि इतरांवर अवलंबून राहणे हे देखील तणावपूर्ण असते. वाढत्या शारीरिक समस्या, एकटेपणा, सामाजिक कार्यातील कमी झालेला सहभाग यामुळे नैराश्‍य येण्यास सुरुवात होते. काही वृद्ध यामुळे व्यसनांच्या आहारी जातात. अशा लक्षणांना वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी काही साधे उपाय मनोचिकित्सक करतात किंवा मनोसोपचातज्ज्ञांचीही यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com