#MokaleVha महिला : घरगुती हिंसाचाराच्या बळी

Domestic-violence
Domestic-violence

यूएन सीईडीएडब्ल्यू ऑफ इंडिया (२०१४) च्या अहवालामध्ये भारतीय समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय संस्था आणि संरचनांमध्ये स्त्रियांविरुद्ध भेदभाव करणाऱ्या माध्यमांमध्ये पितृसत्तात्मक दृष्टिकोन आणि खोलवर रुजलेल्या रूढींच्या दृढतेवर प्रकाश टाकला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समस्येचे राष्ट्रीय स्तरावरील स्वरूप - 
नवीन राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, भारतात ३१.५ टक्के महिला आयुष्यभर आपल्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराचा सामना करतात. तसेच, १५ ते ४९ वयोगटातील ६ टक्के विवाहित महिला लैंगिक हिंसाचाराला बळी पडतात. २५.१ टक्के पतींनी आपल्या पत्नीवर शारीरिक हिंसाचार एक किंवा अधिक वेळा केल्याचे नोंदविले गेले आहे. तसेच, ३०.१ टक्के पतींनी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याची नोंद आहे. सामाजिक अडथळे व बंधनांचा परिणाम म्हणून भारतात नोंदविल्या जाणाऱ्या घरगुती हिंसाचाराचे प्रमाण कमी नोंदविले गेले आहे.

घरगुती हिंसाचाराशी निगडित घटक 
शारीरिक हिंसाचारास प्रवृत्त करणारे घटक म्हणजे बालविवाह, कमी व हलाखीची सामाजिक आर्थिक स्थिती, बालिशपणा, विवाहबाह्य संबंध, दुर्बल कौशल्ये, अकुशलपणा, आत्मसन्मानाचा आभाव आणि घरातील अस्थिर किंवा हिंसक वातावरण. पत्नीला मारहाण करणाऱ्या समुदायाची वृत्ती ही घरगुती हिंसाचाराचे तीव्र पूर्वानुमान आहे. ज्या समाजात पत्नीला मारहाण केली जाते अशा समाजात राहणाऱ्या महिलांमध्ये शारीरिक अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे.

विवाहित पौगंडावस्थेतील मुलींकडे लक्ष देण्याची गरज का?
विवाहित किशोरवयीन मुली आणि तरुण स्त्रिया यांना वृद्ध विवाहित स्त्रियांपेक्षा घरगुती हिंसाचाराचा जास्त धोका असतो. स्त्रियांना होणारा वैवाहिक अत्याचार बहुतेक वैवाहिक जीवनाच्या पहिल्या काही वर्षांत होतो. अल्पवयीन म्हणून लग्न करणाऱ्या स्त्रियांमध्ये प्रौढ म्हणून विवाह करणाऱ्या स्त्रियांपेक्षा वैवाहिक घरगुती हिंसाचार होण्याची शक्यता जास्त असते.

इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट पाचोड (आयएचएमपी)ने केलेल्या विवाहित किशोरवयीन मुलींमध्ये गेल्या १२ महिन्यांतील घरगुती हिंसाचाराच्या अभ्यासानुसार दिसून आले आहे, की बहुतेक मुली घरगुती हिंसाचाराने ग्रस्त आहेत व कुटुंबातील सदस्यांसोबत देखील याची चर्चा करीत नाहीत.

‘आयएचएमपी’चे संशोधन असे सांगते, की अल्प आत्मसन्मान असणारी तरुण माणसेच विचलित आणि धोकादायक वर्तन करतात. घरगुती हिंसाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी व घरगुती हिंसाचार सुरू होण्यापूर्वी त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. एकदा हिंसा झाली, की वर्तन सुधारणे अधिक कठीण आहे. युवतींना त्यांच्यावर घरगुती हिंसाचार होण्याची जोखीम कमी करण्यासाठी त्यांना सशक्त व सजग करणे आवश्यक आहे. पण, ते कठीण आहे. घरगुती हिंसाचार हा तरुणांमधील लैंगिक अज्ञान आणि आत्मविश्वासाच्या अभावाशी संबंधित आहे; जो अगदी लग्नाआधी आणि लग्नानंतर लगेचच वर येतो. 

यावरील उपाय

  • अविवाहित किशोरवयीन मुलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य शिक्षण देणे आवश्यक आहे.
  • विवाहित पौगंडावस्थेतील मुली आणि युवतींसाठी पुनरुत्पादक आणि लैंगिक आरोग्य आणि हक्कांच्या तरतुदीविषयी जागृती करून देणे आवश्यक आहे. घरगुती हिंसाचारामध्ये दुरुस्ती करण्यासाठी हस्तक्षेप आवश्यक आहे.
  • मुले आणि तरुणांसाठी आत्मसन्मान आणि वर्तन, यावर परिणाम करण्यासाठी कौशल्य शिक्षण देणे आवश्यक आहे.

गाव, गट व जिल्हापातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. घरगुती हिंसाचाराने पीडित महिला आणि मुलींना कायदेशीर सहकार्य मिळावे, यासाठी या समित्यांना बळकट व प्रभावी बनविणे आणि अधिक अधिकार देण्याची आवश्यकता आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com