#MokaleVha सोशल फोबिया म्हणजे काय; त्यावर मात कशी करावी?

Shrestha-Bepari
Shrestha-Bepari

सोशल फोबिया म्हणजे काय; त्यावर मात कशी करावी?
माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. आपल्यावर अनेकदा नवीन शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये जाण्याचा प्रसंग आला असेल. जिथे आपल्याला अनोळखी लोकांच्या समोर जावे लागते, अशा वेळी आपली हृदयाची धडधड वाढणे, घाम फुटणे, नैराश्‍य येणे, असे होते.

मात्र, असा लाजाळूपणा वारंवार येत असल्यास, इतर लोकांच्या नजरेस नजर भिडवण्यास भीती वाटत असल्यास, संभाषण सुरू करताना अडचण येत असल्यास, हा ‘सोशल फोबिया’ दूर करण्याची आपल्याला फार गरज आहे. सोशल फोबियाचा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. काही जणांना बस किंवा ट्रेनमधील प्रवाशांशी बोलणे सोईस्कर वाटू शकते. पण, तेच पार्टीमध्ये जाणे मात्र ते टाळतात. आपले इतर लोक निरीक्षण करत असतील, अशी सारखी भीती त्यांच्या मनात असते. भीतीमुळे ते फार कमी संवाद साधतात. या मानसिक आजारावर उपाय म्हणजे, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे होय. काही औषधे आणि मानसिक आरोग्याच्या उपायांनी यावर मात करता येऊ शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्‍लोस्ट्रो फोबिया म्हणजे काय आणि तो कसा बरा होतो?
क्‍लोस्ट्रो फोबिया म्हणजे सुटण्याची कोणतीही शक्‍यता नसणाऱ्या एखाद्या खोलीत बंद होण्याची भीती होय. अनेकांना हा फोबिया असतो. हा फोबिया असणाऱ्यांना जास्त भीती असते आणि त्यामुळे त्यांना पॅनिक अटॅक येण्याची देखील शक्‍यता असते. लिफ्टच्या आत किंवा एखाद्या सिनेमा हॉलमध्ये जाताना अशा लोकांना जास्त भीती वाटते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी ते बाहेर पडता येईल अशा दरवाजाजवळ बसतात. थोडक्‍यात, क्‍लोस्ट्रो फोबिया म्हणजे बंद जागेत अडकण्याची भीती. हा फोबिया लहान मुलांमध्येही आढळून येतो.

अशा वेळी लहान मुले मोकळ्या हवेत येईपर्यंत रडू लागतात किंवा आई-वडिलांना घट्ट मिठी मारतात. मोठ्या लोकांमध्ये मात्र हा फोबिया गंभीर रूप घेण्याची शक्‍यता असते. यामुळे त्यांचे तोंड कोरडे पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, असे परिणाम दिसून येतात. आपल्याकडे अजूनही याला आजार मानला जात नाही. त्यामुळे उपचारही घेतले जात नाहीत. परंतु, यावर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे. लहान मुलांच्या बाबतीत असे घडल्यास लक्षणे वाढण्यापूर्वीच मानसोपचारतज्ज्ञांची भेट घ्यावी.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com