#MokaleVha माझी पत्नी अत्यंत स्वच्छताप्रिय आहे. परंतु, तिचा हा स्वभाव आम्हाला खूप त्रासदायक होतो.

स्मिता प्रकाश जोशी
Sunday, 18 October 2020

तुमच्या पत्नीला ओसीडा हा मानसिक आजार आहे. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे आणि ती केल्याशिवाय चैन न पडणे हा ‘ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर’ नावाचा मानसिक आजार आहे. यासाठी तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यासाठी औषधोपचार आहेत. व्यक्तीच्या वर्तनामध्ये समुपदेशन आणि उपचारांनी बदल होऊ शकतो.

माझी पत्नी अत्यंत स्वच्छताप्रिय आहे. परंतु, तिचा हा स्वभाव आम्हाला खूप त्रासदायक होतो. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ती ऐकत नाही.
तुमच्या पत्नीला ओसीडा हा मानसिक आजार आहे. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे आणि ती केल्याशिवाय चैन न पडणे हा ‘ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर’ नावाचा मानसिक आजार आहे. यासाठी तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यासाठी औषधोपचार आहेत. व्यक्तीच्या वर्तनामध्ये समुपदेशन आणि उपचारांनी बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तिच्यासाठी मानसोपचार करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा व्यक्तींशी कुटुंबीयांचे वर्तन कसे असावे, याबाबतही तुम्ही समुपदेशन करून घ्यावे. तुम्ही तिला समजून घेतले नाही, तर तिच्यावर इलाज करणे शक्य होणार नाही. अशा व्यक्तींना योग्य कौटुंबिक वातावरण देणेही गरजेचे असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------
मी २५ वर्षांची पदवीधर तरुणी असून, मला सध्या कोणीतरी पकडून नेत असल्याचे भास होतात. 
तुला भास होणे हा एक मानसिक आजार आहे आणि त्याला त्वरित उपचारांची गरज आहे. मानसिक आजार हा इतर आजारांसारखाच एक आजार आहे. तो बरा होऊ शकतो. फक्त त्यासाठी वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे. त्यातून तुझी सुटका होऊ शकते. नोकरी, लग्न यावर काय परिणाम होईल, या गोष्टी मनात आणून तुझ्या चिंता वाढवू नकोस. असे काहीही होणार नाही. माझा हा आजार आहे, या गोष्टीचा स्वीकार कर आणि मला या आजारातून लवकरात लवकर बरे व्हायचे आहे, असे मनोधैर्य वाढव.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha Article by Smita Joshi