#MokaleVha ‘बदल’ स्वीकारण्याची मानसिकता

सुकृत देव
Sunday, 20 September 2020

नवरा - बायकोचे नाते हे प्रेम, दृढ विश्वास, निश्‍चय, आपुलकी, आदर अशा गोष्टींवर अवलंबून असते. प्रेम, विश्वास, आदर हे नात्याचे आधारस्तंभ आहेत. नवरा-बायको हे नेहमीच एकमेकांच्या विश्वासास पात्र असले पाहिजेत, तरच हे नाते टिकते. दोघांमध्येही एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता असणे खूप गरजेचे आहे.

नवरा - बायकोचे नाते हे प्रेम, दृढ विश्वास, निश्‍चय, आपुलकी, आदर अशा गोष्टींवर अवलंबून असते. प्रेम, विश्वास, आदर हे नात्याचे आधारस्तंभ आहेत. नवरा - बायको हे नेहमीच एकमेकांच्या विश्वासास पात्र असले पाहिजेत, तरच हे नाते टिकते. दोघांमध्येही एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता असणे खूप गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवरा - बायकोच्या आयुष्यात बदल होणे हे स्वाभाविक आहे. बदल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. जो कधीही, कुठल्याही टप्प्यात होऊ शकतो. ‘बदल’ स्वीकारण्याची मानसिकता दाखवणे व ते प्रत्यक्षात आत्मसात करणे आवश्‍यक आहे. बदल हे सकारात्मक किंवा नकारात्मक होऊ शकतात. 

नात्यातील काही महत्त्वाचे बदल
1) मानसिक बदल 

लग्नानंतर वर्षे निघून जातात, तसे विचार, धोरण बदलू लागतात. चांगली मानसिकता असेल तर चांगले आहे. पण मानसिकता नकारात्मक दृष्टिकोनाकडे गेली तर, हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि ते दोघांसाठीही एक आव्हानच आहे. सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच बदलासाठी पूरक ठरतो.

2) शारीरिक बदल
नवरा-बायकोमध्ये काही शारीरिक बदल झाल्यास (उदा. :  नवरा जाड झाला, केस कमी झाले इत्यादी) हे बदल स्वीकारून पुढे जायला पाहिजे. यामुळे कोणीही आक्षेप घेऊ नये. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर सांभाळणे यालाच आपण लग्न या संस्थेची एक जबाबदारी म्हणू शकतो

3) आर्थिक बदल 
आर्थिक गोष्टींमुळे होणारे बदल आणि त्यामुळे जे ताण-तणाव निर्माण होऊ शकतात, ते दोघांनी समजुतीने एकत्र बसून सोडवले पाहिजेत. उदा. : कुठल्याही कारणासाठी कर्ज घेतले आहे आणि ते फेडणे आवश्‍यक आहे, पण प्रत्येक महिन्याला हप्त्याचे पैसे भरणे अवघड झाले तर, ताण निर्माण होणारच. यासाठी समायोजन आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे गैरसमजाला लांब ठेवून प्रश्न आनंदाने सोडवले पाहिजेत. ‘‘गैरसमज हा नात्यांमधला मोठा शत्रू आहे, त्याला नेहमीच लांब ठेवा.’’

नात्यामध्ये नकारात्मक बदल झाला असेल तर, आपले आचार-विचार बदलून हा बदल  सकारात्मक कसा करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. भारतामध्ये जोडप्यांच्या घरच्यांना बदल नको असतात, बदलाला ते घाबरतात आणि शक्‍यतोवर ते होऊन देत नाहीत. त्यामुळे बदलाचे वारे पचवण्याची शक्ती त्यांना पण आवश्‍यक आहे. पण नवीन पिढीमुळे हा दृष्टिकोन बदलत चालला आहे. काही बदल चांगले असतात, त्यामुळे चांगल्या बदलांचे दोघांनी स्वागतच केले पाहिजे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha Article Sukrut dev

Tags
टॉपिकस
Topic Tags: