#MokaleVha घरी राहिल्यामुळे अस्वस्थता

सुचेता कदम
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आपला रोजचा दिनक्रम, त्यातील नियमितता यामुळे मेंदुलादेखील त्याचा सराव झालेला असतो. अनपेक्षितपणे कोणतेही बदल समोर आले की, मेंदू सर्वप्रथम तो बदल नाकारतो. परंतु, तो बदल लादला गेला की अस्वस्थता वाटू लागते. सजगपणे विचार करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न केल्यास बदलामुळे नेमके काय फायदे-तोटे आहेत, खरेच आपल्याला वाटतो तसा काही त्रास आपल्याला होणार आहे का हे तपासून पाहिल्यास अस्वस्थतेतील निष्फलता जाणवेल.

मी नेहमी कार्यरत राहणारा माणूस असून, आयुष्यात पहिल्यांदाच ऑफिसला न जाता लॉकडाऊनमध्ये घरी बसायला लागले आहे. याचे माझ्यावर दडपण येत आहे. 

आपला रोजचा दिनक्रम, त्यातील नियमितता यामुळे मेंदुलादेखील त्याचा सराव झालेला असतो. अनपेक्षितपणे कोणतेही बदल समोर आले की, मेंदू सर्वप्रथम तो बदल नाकारतो. परंतु, तो बदल लादला गेला की अस्वस्थता वाटू लागते. सजगपणे विचार करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न केल्यास बदलामुळे नेमके काय फायदे-तोटे आहेत, खरेच आपल्याला वाटतो तसा काही त्रास आपल्याला होणार आहे का हे तपासून पाहिल्यास अस्वस्थतेतील निष्फलता जाणवेल. देशाला एका रोगापासून वाचविण्यासाठी काही दिवस घराबाहेर न पडता शांत राहून मदत करायची आहे. यात कोणतेच कष्ट नाहीत. स्वतःचा एक दिनक्रम ठरवा. वेळेत उठणे, स्वतःचे आवरणे, घर आवरणे, स्वतःची घरातून करता येतील अशी ऑफिसची कामे पूर्ण करणे. भरपूर वेळ उपलब्ध असल्याने छंदासाठी वेळ काढणे. संपूर्ण दिनक्रम आपल्या योजनेप्रमाणे पूर्ण केल्यास आनंदही होतो, आणि अस्वस्थताही कमी होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आईला सत्य परिस्थिती सांग
प्रेम प्रकरणातून माझ्या हट्टापायी कॉलेजमध्ये असतानाच मी एका मुलाशी रजिस्टर लग्न केले. वडिलांच्या मृत्यूनंतर तो गावी निघून गेल्यानंतर आमचा संपर्क झाला नाही. मला खूप भीती वाटते आणि आत्महत्येचे विचार मनात येतात.

तुम्ही कायद्याने सज्ञान असल्याने लग्न करू शकता. परंतु, खरेच हा विचार तुम्ही सारासार विवेकबुद्धी वापरून घेतला आहे का, याचा विचार करा. दोघांचेही शिक्षण पूर्ण झालेले नाही. आर्थिकदृष्ट्य़ा सक्षम स्वतःची जबाबदारी घेऊ शकाल अशी नोकरी किंवा कामधंदा नसताना केवळ रजिस्टर लग्न करण्याची घाई केलेली दिसून येते. या आततायी निर्णयाचे अशाप्रकारे त्रासदायक परिणाम समोर येतात. आई-वडिलांना विश्‍वासात घेऊन लग्न केले असल्याचे सांग. यामुळे तुझ्यावरचे दडपण कमी होईल. आई-वडिलांनी तुला समजावून घेतले तर त्यांची तुला मदतच होईल. पण पहिली प्रतिक्रिया ही संताप, चिडणे अशी येऊ शकते. अशावेळी त्यांच्या रागाला तू शांतपणे सामोरी जा. यामुळे अस्वस्थता कमी होऊन आत्महत्येसारखे विचारही दूर सारता येतील. सर्व परिस्थिती ठीक झाल्यावर त्या मुलाशी संपर्क साध. संपर्क होऊ शकला नाही तर ओळखीच्या एखाद्या व्यक्ती मार्फत संपर्क साधू शकते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha Discomfort from staying at home

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: