Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

Mongoose and Human Story : एका गरीब मुंगसाची आणि त्याच्या कुटुंबाची ही विनोदी, उपरोधिक कथा सरकारी नोकरी, विशेष नेमणूक, संशोधन आणि माणसांच्या जगाचे कल्पक प्राणीकथेतून मिश्कील चित्रण करते.
Mongoose satire story

Mongoose satire story

esakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी - saptrang@esakal.com

कथेचे शीर्षक वाचून थोडा गोंधळ उडाला ना? खरे तर मूळ कथा पाळलेल्या मुंगसाचीच आहे. मुलावर लक्ष ठेवण्यासाठी एक गरीब शेतकरी मुंगूस पाळतो आणि एके दिवशी घरी आल्यावर मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेले बघून त्याला वाटते,की मुंगसाने आपल्या बाळाला मारले. त्या रागात तो मुंगसाचा जीव घेतो. पण मुंगसाने माणूस पाळला तर काय होईल ते वाचू या आजच्या कथेत....

एका खेडेगावात एक गरीब मुंगूस राहत असे. खरे तर सरकारी नोकरीमध्ये मुंगसाचे अजिबातच भागत नव्हते. म्हणजे कोब्रा पोस्टिंगवर तो या गावात आला होता खरा, पण जरा म्हणून जीवाला निवांतपणा मिळत नसे. अमुक ठिकाणी नाग, साप आढळला की रात्री अपरात्रीदेखील त्याला घराबाहेर पडावे लागे. त्याची ही विशेष नेमणूक असल्याने त्याला नाकारता आलेली नव्हती. मुंगसाची बायकोदेखील नाग-साप पकडण्यात वाकबगार होती. मुंगसाच्या खात्यातच ती नोकरीला होती. ती तर कीटक तज्ज्ञदेखील होती. कुठले कीटक विषारी आहेत, कुठले बिनविषारी आहेत या विषयाचा तिचा प्रगाढ अभ्यास होता. ''विषारी-बिनविषारी कीटकांच्या जाती आणि त्याचा प्राणिसृष्टीवर होणारा परिणाम'' या विषयावर तिने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात असताना विशेष संशोधन केलेले होते. त्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने तिला डॉक्टरेट पदवी प्रदान करून, डॉक्टरेट मिळवणारी पहिली स्त्री मुंगूस असा तिचा विशेष नामोल्लेख केलेला होता. ''दिल की बात'' कार्यक्रमात तिच्या या विशेष गुणांचे कौतुकपर वर्णन केलेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com