

MPSC Exam Reforms
esakal
राजेंद्र धारणकर - saptrang@esakal.com
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, त्यातील बदल याबाबत राज्यात आंदोलने आणि चर्चा सुरू आहेत. यासंदर्भातील सुधारणांबाबत काम करणाऱ्या ‘सिस्कॉम’ या संस्थेने बरेच उपाय सुचवले आहेत. या परीक्षाबाबतचा पेच आणि विद्यार्थ्यांची बाजू या सगळ्यांच पैलूचा मागोवा...
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुख्यालयासमोर स्पर्धा परीक्षा पद्धतीविरोधात झालेले आंदोलन केवळ तात्कालिक तांत्रिक निर्णयांविरुद्ध नव्हते. एका बाजूला प्रशासकीय वेग वाढवण्याचा सरकारचा दावा आणि दुसऱ्या बाजूला ‘कंत्राटीकरण’ व ‘अपारदर्शकते’मुळे लाखो होतकरू विद्यार्थ्यांचे धोक्यात आलेले भवितव्य, अशा कात्रीत या स्पर्धा परीक्षा सापडल्या आहेत.