Marathi Book Review : ‘मुलखावेगळ्या’ स्त्रियांच्या आयुष्याचा वेध; यशासोबत संघर्ष आणि उणिवांचेही प्रामाणिक चित्रण

Marathi Book Review and Women Biographies : ‘मुलखावेगळ्या... बाईच्या मनस्वीपणाची स्पंदनं’ या पुस्तकातून चौदा कर्तृत्ववान स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व, संघर्ष, धाडसी निर्णय, यश आणि वैयक्तिक आयुष्यातील उणिवा उलगडणारे लेखन.
Marathi Book Review and Women Biographies

Marathi Book Review and Women Biographies

esakal

Updated on: 

राधिका परांजपे-खाडिलकर - radhika.paranjape@esakal.com

मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाला समृद्ध परंपरा लाभली आहे. एखाद्या व्यक्तीचा जीवनपट मांडताना तिच्या अंगभूत गुणांचा, सौंदर्याचा, संघर्षाचा आणि मनस्वीपणाचा मागोवा घेणारी पुस्तके वाचकांच्या मनावर गारूड करतात. नीलिमा बोरवणकर, संगीता पुराणिक आणि प्रमोदिनी वडके-कवळे या लेखिकांनी एकत्र येऊन साकारलेले ‘मुलखावेगळ्या... बाईच्या मनस्वीपणाची स्पंदनं’ हे पुस्तक याच परंपरेतील एक पुष्प आहे.

पुस्तकाच्या शीर्षकातच त्याचा गाभा आहे. पुस्तकात ज्यांचे व्यक्तिचित्रण आहे, त्या स्त्रिया केवळ कर्तृत्ववानच नाहीत, तर आपल्या विचारांमुळे, आयुष्यात घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे आणि जगण्याकडे बघण्याच्या स्वतंत्र दृष्टिकोनामुळे खऱ्या अर्थाने ‘मुलखावेगळ्या’ ठरलेल्या आहेत.

वेगवेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या या चौदा स्त्रियांच्या आत्मचरित्राचा आधार घेऊन लिहिलेले व्यक्तिचित्रणपर लेख त्या स्त्रियांची समर्पक ओळख करून देतात. ओघवती शैली आणि महत्त्वाच्या घटनांची योग्य मांडणी ही या पुस्तकाची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. व्यक्तिचित्रणपर लेखनात कोणत्या घटनांचा उल्लेख करायचा आणि कोणते उल्लेख टाळायचे याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. त्यासाठी त्या व्यक्तीचे आत्मचरित्र काळजीपूर्वक वाचावे लागते, हे भान लेखिकांनी ठेवले आहे.

Loading content, please wait...