
सुलभा तेरणीकर - saptrang@esakal.com
सिनेमा उद्योगाची पट्टराणी होण्याच्या दिशेने मुंबई बहरत होती. वाढत होती. स्वच्छ सूर्यप्रकाश, मनुष्यबळ, वित्तपुरवठा करणारे धनिक यांनी या सिनेनगरीला शृंगारले. ही नव्वद वर्षांपूर्वीची गोष्ट आहे; पण त्या गोष्टीच्या अंतरंगात डोकावलं तर ती कालपरवाची वाटेल... परीकथेहून वेगळी, अद्भुत अशी कथा... झुंबरावरून झुलणाऱ्या, पुरात उडी मारणाऱ्या, तलवारबाजी करणाऱ्या हंटरवाली फियरलेस नादियाची साहस कथा...