

Harris and Giles Shields: A Century of Mumbai Cricket Legacy
Sakal
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
शालेय स्तरावर प्रत्येक विद्यार्थी घडत असतो. बालपणीचे संस्कार पुढे अंगवळणी पडतात. वरिष्ठांचा आदर करणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे, घर असो किंवा इतरत्र ठिकाणी सभ्य वर्तणूक करणे या सर्व महत्त्वाच्या बाबी ठरतात. खेळामध्येही हेच तंत्र लागू होते. शालेय स्तरावर चमक दाखवल्यानंतर पुढे जाऊन शहर, राज्य व देशासाठी खेळण्याची संधी उपलब्ध होते. मुंबईतील हॅरिस व गाइल्स या दोन महत्त्वाच्या शालेय स्पर्धांमधून एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू निर्माण झाले. यंदा हॅरिस शिल्डमध्ये २००, तर गाइल्स शिल्डमध्ये १९७ शाळांनी सहभाग घेतला. हा जागतिक विक्रम ठरला.