we are lady parts serial
sakal
‘वुई आर लेडी पार्ट्स’ मालिका स्थलांतरित मुस्लिम स्त्रीचं चित्रण केवळ तिच्या दुःखांपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर तिच्या आनंदात, तिच्या विनोदबुद्धीत आणि तिच्या विरोधातही तिचं अस्तित्व पाहते. या स्त्रिया सतत काहीतरी चुकीचं म्हणतात, घाबरतात, गोंधळतात आणि म्हणूनच त्या जिवंत वाटतात.