

New Marathi Book
esakal
नीरा आर्य ह्या ‘आझाद हिंद फौजे’च्या ‘राणी झाशी रेजिमेंट’मध्ये कॅप्टन होत्या. त्या ‘नीरा नागीण’ नावानेही ओळखल्या जात असत. हे पुस्तक नीरा आर्य यांचे आत्मचरित्र आहे. त्याची पहिली आवृत्ती १९६६ मध्येच प्रकाशित झाली होती. मात्र, ‘आझादी का अमृतमहोत्सवो’च्या पार्श्र्वभूमीवर या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन २०२२ मध्ये हिंदी भाषेत पुन्हा करण्यात आले. त्याचा मराठी अनुवाद नरेंद्र गोळे यांनी केला आहे. मूळ संहितेचे संपादन मन्मथनाथ गुप्त आणि आविष्कार आर्य यांनी केले आहे. नीरा आर्य महान देशभक्त, दृढ साहसी आणि स्वाभिमानी महिला होत्या. त्यांचे आत्मचरित्र प्रेरणादायी आहे.
वैशिष्ट्य : लेखिका ‘आझाद हिंद फौजे’च्या ‘राणी झाशी रेजिमेंट’मध्ये कॅप्टन असल्याने पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.
प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : २०६ मूल्य : ३०० रु.