
नरेश शेळके - naresh.shelke@esakal.com
टोकियोत विद्यमान विश्वविजेता म्हणून नीरज ज्यावेळी दाखल होईल, त्यावेळी त्याच्यापुढे वेबरचे तर आव्हान असेल, त्याचप्रमाणे अन्य काही खेळाडू असतील, ज्यांचे आव्हान नीरजला मोडून काढावे लागेल. त्यात ब्राझीलचा लुईस दा सिल्वा, पाकिस्तानचा पॅरिस ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम, अमेरिकेचा कर्टीस थॉम्पसन, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता जपानचा युता साकीयामा श्रीलंकेचा रुमेश पथिरागे यांचे आव्हान असेल.