
Elephants Of Peace
sakal
गौरी देशपांडे-gaurisdeshpande1294@gmail.com
भेटवस्तू कोणाला आवडत नाहीत? घ्यायला तर आवडतातच आणि आपल्या माणसांना द्यायलासुद्धा! मित्र एकमेकांना भेटवस्तू देतात हे तर आपल्याला माहितीय, पण कधी कधी भेटवस्तू दिल्याने मैत्री होते! आणि ते ही माणसा-माणसांमध्ये नाही तर चक्क देशा-देशांमध्येसुद्धा!त्याचं झालं असं की, एके दिवशी दुपारी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची गच्च भरलेली टपालाची पिशवी उघडली आणि बघतात तर काय! आतून हजारो कार्ड्स आणि पत्रे बाहेर पडली! ती नेहमीसारखी नव्हती. ती होती रंगीबेरंगी आणि सजावट केलेली पत्रे. ही पत्रे मुलांची होती हे त्यांना कळलंच, पण ती काही भारतातल्या मुलांची नव्हती, तर ती होती जपानच्या टाईटो वॉर्डमधल्या मुलांनी पाठवलेली.