
भारतात आघाडीवर असलेल्या या पाच कंपन्यांशी स्पर्धा करीत बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिअलमी, मोटोरोला तसेच इन्फिनिक्स या कंपन्यांनी नुकतेच नवे स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. रिअलमीने जीटी ७ मालिकेत रिअलमी जीटी ७, रिअलमी जीटी ७ ड्रीम एडिशन आणि रिअलमी जीटी ७ टी हे तीन दमदार स्मार्टफोन आणले आहेत. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात प्रथमच आलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ९४००ई प्रोसेसर, तब्बल ७,००० एमएएचची बॅटरी आणि १२० वॉटचा अल्ट्राचार्जर. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत ८जीबी, १२जीबीपर्यंत मिळणारी रॅम रिअलमी जीटी ७मध्ये मात्र तब्बल १५ जीबीपर्यंत, तर जीटी ७ ड्रीम एडिशनमध्ये १६ जीबीपर्यंत मिळणार आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी यामध्ये सोनी आयएमएक्स ९०६ कॅमेरा लेन्स असून जगात पहिल्यांदाच फोर-के अंडरवॉटर व्हिडिओ मोड दिला आहे.