
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
मराठवाड्याच्या कला विश्वात वेगळाच आब राखून अनेक मंदिरे आपल्याला खुणावत असतात. या मंदिरांमुळे मराठवाडा हा मंदिरांचा वाडा म्हणूनही ओळखला जातो. याला कारणही तसेच आहे. शिल्प-वैभवाने समृद्ध असलेली अनेक मंदिरे या भागात फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या कला-प्रेमामुळे या भागात मंदिराच्या रूपाने अनेक कलेची पीठे उभारली गेली. या अशा मंदिरांमुळे तत्कालीन स्थापत्य शैलीसुद्धा किती विकसित होती, हेसुद्धा आपल्याला लक्षात येईल. या यादीत लातूर जिल्ह्यातीलसुद्धा एक मंदिर उभं आहे. निलंगा शहरात असणारं हे मंदिर म्हणजेच निळकंठेश्वराचे मंदिर. स्थानिक भाषेत ‘हरिहरेश्वर’ नावाने ओळखले जाणारे मंदिर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मंदिर आहे.