पॅंडोरा पेपर : गौप्यस्फोटाची दुसरी बाजू

जगभरच्या प्रसारमाध्यमांतील ‘शोध पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटने’ ने (आयसीआयजे) नुकतेच तब्बल एक कोटी १२ लाख कागदपत्रांचे विश्लेषण करून काही धक्कादायक बाबी उघड केल्या.
Pandora Papers
Pandora PapersSakal

- नितीन सेठी saptrang@esakal.com

जगभरच्या प्रसारमाध्यमांतील ‘शोध पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटने’ ने (आयसीआयजे) नुकतेच तब्बल एक कोटी १२ लाख कागदपत्रांचे विश्लेषण करून काही धक्कादायक बाबी उघड केल्या. हीच कागदपत्रे ‘पॅंडोरा पेपर’ म्हणून ओळखली जात आहेत. जगातील काही गर्भश्रीमंत कर चुकविण्यासाठी व सरकारपासून आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती कर नसलेल्या देशांत कशी लपवतात, यावर ‘पॅंडोरा पेपर’ ने प्रकाशझोत टाकला आहे. अशा देशांत गर्भश्रीमंतांना नियम, मूल्ये पायदळी तुडवून गोपनीयता प्रदान केली जाते.

सामान्यत: चांगल्या शोध पत्रकारितेत बेकायदेशीर कृत्ये, अनैतिक व्यवहारात किंवा दोन्हींत सहभागी असलेल्या श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तींचा भंडाफोड केला जातो. काहीजण आपली बेकायदेशीरपणे मिळविलेली संपत्ती लपवितात तर काहीजण सरकारी करजाळ्यातून वाचण्यासाठी ती कायदेशीरपणे सुरक्षित ठेवतात. तरीही, इतर काही जण कमीतकमी कर आकारल्या जाणाऱ्या मार्गांद्वारे जगभरात कायदेशीररीत्या व्यावसायिक व्यवहार करतात.

आयसीआयजेने स्पष्ट केल्यानुसार पॅंडोरा पेपरमध्ये श्रीमंतांना पुरविल्या जाणाऱ्या १४ परदेशी सेवांची गुप्त माहिती दिली आहे. यात श्रीमंतांसाठीचे ट्रस्ट, बनावट कंपन्यांचा कमी कर किंवा कर नसलेल्या विभागात समावेश करू इच्छिणाऱ्या कंपन्यांही आहेत.

परदेशातील या सेवांचे पुरवठादार श्रीमंत व्यक्ती तसेच कंपन्यांना करमुक्त किंवा कर नसलेल्या देशांत करचुकवेगिरी करून संपत्ती लपविण्यासाठी भरमसाठ शुल्क घेणारे तज्ज्ञ विविध पर्याय सुचवितात. हे तज्ज्ञ या श्रीमंतांना संपत्ती कशी मिळविली किंवा ती कायदेशीर मार्गाने मिळविली आहे का याची विचारणा करत नाहीत. आयसीआयजेने अशा श्रीमंत आणि शक्तिशाली भारतीयांबद्दल माहिती मिळविण्यासाठी ‘इंडियन एक्सप्रेस’शी करार केला आहे. त्यातूनच एकीकडे सचिन तेंडुलकर सारखा ‘मास्टर ब्लास्टर’ क्रिकेटपटू तर दुसरीकडे निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची नावेही उघड झाली. सेलिब्रिटी ते सामान्य व्यक्तींच्या या दोन टोकांमध्ये उद्योजक महिला, पुरुषही आहेत. या सर्वांनी आपली संपत्ती भारताबाहेर गोपनीयरित्या दडविल्याचा ‘पॅंडोरा पेपर’चा दावा आहे.

मात्र, जगातील इतर अनेक देशांप्रमाणे, परदेशात गुप्तरीत्या संपत्ती लपविणाऱ्यांच्या या यादीत देशातली एकाही राजकारण्याचे नाव नाही. भारतात निवडणुकीसाठी निधी कसा दिला जातो, याची किमान माहिती असणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला या यादीत राजकीय नेत्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल. भारताव्यतिरिक्त इतर देशांत मात्र शक्तिशाली व्यक्तींसह राजकीय नेत्यांचीही नावे पॅंडोरा पेपरमध्ये जाहीर झाली आहेत. मग, पॅंडोराच्या या गौप्यस्फोटाला कितपत महत्त्व द्यावे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे, या पेपरमुळे भारत किंवा इतर देशांतील अशा धनाढ्यांचा संपत्तीबाबतचा दृष्टिकोन बदलू शकतो का, हाही एक प्रश्न आहे.

खरे तर अशा करमुक्त देशांत करचुकवेगिरी करून संपत्ती लपविणे नवीन नाही. हा प्रकार १९२० पासून सुरू असून तो वाढतही गेला. विकसित देशांत श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तींची संख्या वाढत गेली तसे त्यांनाही फायद्यासाठी करचुकवेगिरी करून गुप्त पद्धतीने संपत्ती लपविता येते, हे लक्षात आले.

पॅंडोरा पेपरने यापूर्वीच्या अशा पद्धतीप्रमाणेच कमी कागदपत्रांत माहिती दिली आहे. मात्र, करमुक्त देशांत संपत्ती लपवण्याची शक्यता असणाऱ्या उद्योजक स्त्री, पुरुषांची नावेही जाहीर केली आहेत. त्यामुळे, या तपासातून याबाबतचे अधिक स्पष्ट चित्र समोर येऊ शकते. अशा प्रकारे संपत्ती लपविणाऱ्यांनी ती कायदेशीर मार्गाने मिळविली आहे का, हे पॅंडोरा पेपरमधून स्पष्ट होत नाही. त्यामुळे, काही बाबतीत वाचकांना अशा धनाढ्य व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेऊन त्यांनी ही संपत्ती कायदेशीररीत्या मिळविता येऊ शकते का, याची कल्पना करण्यास सांगितले गेले. मात्र, हे थोड्या श्रीमंताच्या बाबतीतच असे करण्यत आले.

‘पॅंडोरा पेपर’सारख्या श्रीमंत, शक्तिशाली व्यक्तींची नावे जाहीर करण्याच्या प्रकारात नैतिक दबाव निर्माण करण्याची क्षमता असते. सचिन तेंडुलकरसारखा भारतरत्न पुरस्कार मिळालेला खेळाडू एकीकडे शेतकरी आंदोलनाबद्दलचे जनमत प्रभावित करण्यासाठी केंद्र सरकारचे समर्थन असलेल्या ‘राष्ट्रवादी’ किताबामुळे खूष होतो. त्याचवेळी, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली संपत्ती गोपनीयरित्या लपविण्यासाठीही वेळ खर्च करतो. त्यामुळेच, ‘स्पोर्ट्‌स आयकॉन’ असलेल्या सचिनच्या एका राष्ट्रीय ब्रॅंडमध्ये बदललेल्या लोकप्रियतेची परदेशातील गोपनीय संपत्ती दडविण्याविरुद्ध तपासणी केली जाते.

पॅंडोरा पेपरच्या या बॉम्बमुळे सचिन तेंडुलकर किंवा किरण मजुमदार शॉ यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींना सरकारी धोरणांवर आत्मविश्वासाने वक्तव्य करण्याच्या क्षमतेला तात्पुरता धक्का बसू शकतो. मात्र, त्यांच्या मतांना महत्त्व का दिले जाते, याचे तसे कोणतेही ठोस कारण नाही. या ते अल्प काळच्या विस्कळीतपणानंतर पुन्हा पूर्वीसारखे निगरगट्ट होतील.

मात्र, केवळ स्वत:साठी संपत्ती बनविण्यात व्यग्र असणारे श्रीमंतांना लोककल्याणाची दांभिक प्रतिमा तयार करणे पसंत करत नाही. अशा श्रीमंतांच्या प्रतिमेला डाग पडण्याची शक्यता नाही. मुळात, त्यांनी कधीही स्वत:ची सार्वजनिक प्रतिमा तयार केली नाही. याबाबत, त्यांनी पडद्याआड राहणेच पसंत केले.

कारवाईची शक्यता कमीच

पॅंडोरापूर्वीही पनामासारख्या काही कागदपत्रांतून करचुकवेगिरी करून परदेशांत संपत्ती लपविणाऱ्या बड्या व्यक्तींबद्दल गौप्यस्फोट करण्यात आला होता. सरकारचा कर व सक्तवसुली विभागच याचा केंद्रबिंदू होता. त्यांना अशा प्रकारे कर चुकवून गुप्त परदेशात संपत्ती दडविणाऱ्या गर्भश्रीमंतांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. मात्र, परदेशातील कर नसलेले देश कसे काम करतात, हे जाणून घेण्यासाठी भारत सरकार आणि सक्तवसुली संचालनालयाला पॅंडोरा पेपरची गरज पडेल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. देशातील अनेक सेलिब्रिटी करमुक्त देशांतील फायदे उपभोगत आहेत. सरतेशेवटी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घकाळापूर्वी या देशांतून काळा पैसा परत आणण्याचे आश्वासनही दिले होतेच.

सध्याच्या पेगॅसस, डिजिटल पाळत ठेवण्याच्या युगात भारतातील कर विभागाला अभिजन वर्गाच्या संपत्ती खर्च करणे व लपविण्याबद्दल माहीत नसेल, भारतीयांच्या परदेशातील संपत्तीविषयी माहिती घेण्यासाठी त्यांना निर्भीड पत्रकाराची गरज पडेल, असा विचार करणे मूर्खपणाचे होईल. त्याचप्रमाणे, सध्या आपल्या देशाच्या सरकारनेच राजकीय पक्षांना भारतातून तसेच भारताबाहेरून गुप्तपणे बेहिशोबी निधी जमा करण्यासाठी कायदेशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे, पॅंडोरा पेपरच्या आधारे मोठी कारवाई होणार आहे, असा विचारही चुकीचाच. यातून केवळ सरकारच्या महसुलात आणखी काही कोटींची भर टाकण्यासाठी कर भरण्याच्या नोटिसा पाठविल्या जाऊ शकतात.

त्यामुळेच, पॅंडोरा पेपर हे एक प्रकारचे स्मरणपत्र आहे. जे खूप उशिराने तयार झाले आहे. ते आपल्या लोकशाहीला बदनाम करत राहील. मात्र, असे केल्याने तरुण पिढीला प्रत्यक्षातील जग कसे काम करते, याची जाणीव करून देण्यासाठी पॅंडोरा पेपर हा जगभरातील पत्रकारितेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

समाजासाठी सध्याच्या या गौप्यस्फोटांपेक्षा किंवा अशा घटना उघडकीस आणण्यापेक्षा जगभरातील खंडाखंडात सहकार्याचे मॉडेल तयार होण्यात अधिक मूल्ये असू शकतात.

(अनुवाद : मयूर जितकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com