
Novak Djokovic
sakal
जयेंद्र लोंढे-jayendra.londhe@esakal.com
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर व स्पेनचा राफेल नदाल या दोन टेनिसपटूंनी एक काळ गाजवला. याचदरम्यान सर्बिया या युरोपमधील देशातून नोवाक जोकोविचसारखा आक्रमक धाटणीचा टेनिसपटू पुढे आला. इंग्लंड, स्पेन, इटली, जर्मनी, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधून एकापेक्षा एक असे दर्जेदार टेनिसपटू घडताना पाहिले आहेत; पण सर्बिया यासारख्या छोट्याशा युरोपियन देशामधून जोकोविच टेनिस या खेळाच्या क्षितिजावर झळकू लागला.