एकांकिका म्हणजे नाट्यकलेत पुढे जाण्याची पहिली पायरी. अनेक कलाकार उमेदीच्या काळात एकांकिका सादर करतात. त्यानंतर प्रायोगिक किंवा व्यावसायिक असे दोन अंकी नाटक खेळून पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करतात. असाच प्रवास करून अनेक कलावंत आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत.
त्यामुळे महाविद्यालयीन कलावंतांचा नाट्यकलेचा हा पाया भक्कम करण्याचा ‘सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’चा हेतू होता. या वर्षी मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ज्या उत्साहाने एकांकिका सादर केल्या, तो नाट्यजल्लोष ‘सकाळ करंडक’च्या हेतूची पाठराखण करणारा आहे, असेच म्हणावे लागेल.