

Paratrooper Sanjog Chhetri Mahavir Chakra
esakal
काश्मीरमधल्या दहशतवादाचा भीषण इतिहास कायमच अस्वस्थ करणारा आहे. तिथे शत्रू समोरून वार करत नाही, तर छुप्या मार्गाने अधिकाधिक विध्वंस करत जातो. त्यामुळे लष्करासाठी त्या दहशतवाद्यांना ठार करणं हे काम कधीही सोपं नव्हतं. वेगवेगळ्या स्वरूपात, भिन्न भिन्न तंत्र वापरत दहशतवादी काम करतात. मात्र, त्या त्या वेळी लष्कराने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. या युद्धकथा फार चित्तथरारक आहेत. ‘हे सारं कशासाठी?’ या प्रश्नाचं उत्तर वर्षानुवर्षांपासून काहीसं अनुत्तरित आणि खूपसं अस्वस्थ करणारं आहे. ही अशीच एक युद्धकथा आहे, एका धाडसी मोहिमेची. तिचं नाव होतं - सर्पविनाश!
‘सर्पविनाश’ ही भारतीय लष्कराने एप्रिल-मे २००३ च्या दरम्यान काश्मीरमधल्या पीरपंजाल पर्वतरांगांमधल्या हिलकाका-पूंछ-सुरणकोट या भागात तळ ठोकून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी हाती घेतलेली एक नियोजनबद्ध मोहीम होती. पॅराट्रुपर संजोग छेत्रीसारख्या योद्ध्याने प्रणाची बाजी लावत ही मोहीम फत्ते केली!