
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
राजस्थानमधील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळाची सैर घडवणारी ‘पॅलेस ऑन व्हील्स’ रेल्वे सर्वांनाच ठाऊक आहे. पंचतारांकित आणि सर्व सुविधांची प्रचिती देणाऱ्या या रेल्वेचा प्रवास संस्मरणीय ठरणारा असतो; पण रस्त्यावरचा प्रवासही तितकाच सुविधायुक्त, आरामदायी आणि हॉटेलमधील एखाद्या लाउंजचा अनुभव देणारा असल्यास कोणत्याही व्यक्तीला अशा वाहनांतून प्रवास करण्याचा मोह झाला नाही तर नवलच. म्हणूनच वाहन कंपन्यांनी बदलत्या काळानुरूप चारचाकी वाहनांच्या इंटेरियरमधील आमूलाग्र बदल करीत सर्वसामान्यांचा प्रवासही समृद्ध केला आहे.