एकेकाळी नाक्यानाक्यावरील बेकऱ्या हा मुंबईकरांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता. सकाळी आणि संध्याकाळी लहान मुलांना सुट्टे पैसे देऊन जवळच्या बेकरीवर जाऊन ब्रेड, पाव, टोस्ट किंवा खारी आणायला सांगितली जायची.
गरमागर, ताजे, सुगंधित आणि चविष्ट बेकरीचे पदार्थ चहात बुडवून तेव्हाच्या तेव्हा फस्त केले जात असत. ते खाल्ल्यावर आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या समाधानाची तुलना कशासोबतही करणे कठीण आहे.