
- अजेय दळवी, ajeydalvi2@gmail.com
कवी-लेखक-नाटककार असलेले थोर विचारवंत रवींद्रनाथ टागोर हे चित्रकलेकडं वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या प्रदीर्घ अनुभवसामर्थ्यासह वळले होते. त्यांची मातृभाषा बंगाली असली तरी इंग्लिशबरोबरच त्यांना फार्सी भाषाही आत्मसात होती. ते अनेक देश फिरलेले असल्यामुळं अनेक बाबतींत वैचारिकदृष्ट्या पुरोगामी होते. त्यांच्यावर वैश्विक प्रभाव असला तरी ते आंतर्बाह्य भारतीय होते.