
शिल्पा कांबळे-shilpasahirpravin@gmail.com
आपल्या सगळ्यांना आयुष्यात थकवा येतो. ‘रूटीन’चा कंटाळा येतो. तेच तेच करून नकोसे वाटते. माझेही तसे होते. एकदमच जगण्याची बॅटरीच ‘डिफ्युज’ झालीय असे वाटते. अशा वेळी आजूबाजूच्या काही स्त्रिया माझ्या ‘पॉवरहाउस’ होतात. त्यांना भेटून, बोलून माझे मन तरतरीत होते. जगण्यातील मरगळ निघून जाते. हे ऊर्जेचे स्रोत मला जगण्यासाठी अत्यावश्यक सदरात मोडणारे आहेत.