
Mumbai Food Journey
Sakal
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
दादरमधील प्रकाश शाकाहारी उपाहार केंद्राला तीन पिढ्यांचा समृद्ध वारसा असून, मराठी खाद्यसंस्कृतीचा अभिमान जोपासणारे आहे. तिखटाचा मर्यादित वापर असलेले वेगवेगळे जिन्नस, चव, पौष्टिक, शाकाहारी आणि दिसायला आकर्षक मराठी पदार्थांची कीर्ती ‘प्रकाश’च्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचलेली आहे.