भारतासह जगातील अनेक राष्ट्रांमधील मान्यवर लेखक, संपादक आणि प्रकाशकांनी मिळून एक पत्रक प्रसृत केले आहे. आजवरच्या देशातील सर्वाधिक रकमेच्या साहित्य पुरस्काराच्या संदर्भातले ते पत्रक आहे. विध्वंसाच्या प्रतीकाच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा त्यात निषेध करण्यात आला आहे. सध्या जगभर जो ‘बुलडोझर वाद’ उफाळला आहे त्याचा निषेध होतोय आणि तो योग्य नाही, असे कोण म्हणेल?