.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
- डॉ. आनंद नाडकर्णी
गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे ‘कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.’ हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा ‘व्यवसाय-मित्र’ म्हणजेच सायकिॲट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.