
- शीतल बापट, saptrang@esakal.com
समाजमाध्यमे (सोशल मीडिया) आणि तंत्रज्ञानाचा लहान मुलांवरचा नकारात्मक परिणाम वारंवार दिसून आला आहे. तो नव्याने समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आपण मोठ्या माणसांनीच मुलांसाठी ही घसरगुंडी तयार केली आणि आता त्यांना घसरताना थांबवावं कसं हे आपल्याला कळेनासं झालंय. आपल्या मुलांना स्वत:चाच पराभव करताना, स्वत:ची मानसिक शांतता, प्रगती, सारे काही उधळून लावताना पाहणे वेदनादायी असते.