

ram lakshman
sakal
ऋचा थत्ते- rucha19feb@gmail.com
सावळा गं रामचंद्र
त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे
चार अखंड चरण
गीतरामायणात माता कौसल्येच्या मुखी असलेलं हे गीत. रामरायाच्या बाळलीलांचं वर्णन करणारं हे गीत. मूळ वाल्मिकी रामायणात नसलेलं हे वर्णन गदिमांनी आपल्या अलौकिक प्रतिभेतून साकारलंय. त्यामध्ये या दोन ओळींत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चार भावंडांमधला जो विलक्षण प्रेमाचा धागा आहे, त्याला गदिमांनी दिलेली श्लोकाच्या चार चरणांची उपमा मनोमन पटणारी आहे.