Ram Rahman Photography : फक्त फोटोग्राफर नव्हे, दृश्य इतिहासकार राम रहमान; इमारतींपासून लोकसंस्कृतीपर्यंत पन्नास वर्षांचा छायाचित्र प्रवास

Ram Rahman Cultural History : राम रहमान यांच्यासाठी छायाचित्रण केवळ दृश्य टिपण्याची कला नाही, तर इतिहास, वास्तू, शहरे आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा मागोवा घेणारे व्यापक माध्यम आहे.
Ram Rahman Cultural History

Ram Rahman Cultural History

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

राम रहमान यांच्यासारखे छायाचित्रकार हे आपल्या कामाला कलाच समजतात. छायाचित्रणाची कला त्यांच्या कार्याचा फक्त वरवर दिसणारा पैलू आहे. त्यामागे खोलवर इतिहास दडलेला आहे.

छायाचित्रणाची कला अर्थातच फोटोग्राफी हे राम रहमान यांच्यासाठी फक्त दृश्यचित्र तयार करण्याचे तंत्र राहिले नाही. ते तंत्र सांस्कृतिक घडामोडीचा इतिहास ग्रथित करते. छायाचित्रकार (फोटोग्राफर), क्युरेटर, अभिलेख शास्त्रज्ञ, रचनाकार (डिझायनर) यांपैकी कोणताही शब्द राम रहमान यांच्या व्यक्तिमत्त्वाला पुरेसा नाही. त्यांच्याशी तास दोन तास संवाद साधा आणि तुमच्या लगेच लक्षात येईल, की छायाचित्रण हा काही त्यांच्यासाठी फक्त व्यवसाय नव्हता. त्यांचा आवाका बराच मोठा होता. त्यात कलाकार, वास्तुशास्त्रज्ञ, नर्तक, संगीतकार, लेखक आणि विचारवंत या सर्वांचा समावेश आहे. आपल्यात्यांचे सतत लक्ष व्यवसाय करण्याकडे नाही तर त्यांचे कुतूहल शमवण्याकडे आहे. गेली पन्नास वर्षे राम रहमान यांनी फक्त इमारती नव्हे तर शहरे आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा साक्षीदार म्हणून काम केले आहे.

या प्रवासात त्यांची छायाचित्रे ही जगप्रसिद्ध म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्कचे मेट्रोपॉलिटन म्युझियम, लंडनची टेट गॅलरी, पॅरिसमधील पोंपीदो, वॉशिंग्टनची स्मिथसोनिअन इन्स्टिट्यूट, दिल्लीतील किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट आणि पुण्यातील झपुर्झा म्युझियम ऑफ आर्ट सारख्या म्युझियममध्ये आणि संग्रहात दिमाखाने सापडतील. त्यांच्या स्वतःच्या छायाचित्रणाच्या व्यवसायासोबत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. अनेक महत्त्वाच्या कलाकृतींचे जतन केले आहे आणि भारतीय छायाचित्रण कलेचे महत्त्व लोकांना समजण्याचे काम केले आहे. तरी ते स्वतःच्या स्वतंत्र कामगिरीबद्दल क्वचितच बोलतात. कशी नजर घडवावी याबद्दल ते बोलत असतात. ‘माझ्या भोवताचे जग कसे जाणून घ्यावे याचाच मला सतत ध्यास आहे.’ या साध्यासुध्या वाक्यात त्यांच्या कामाचे मर्म सापडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com