Marathi Classic Revival: शंभर वर्षांनंतर ‘रत्नाकर’चा पहिला अंक पुन्हा वाचकांसमोर; मराठी साहित्यविश्वातील ‘रत्नाकरयुगाची’ नव्याने ओळख

First issue of ‘Ratnakar’ republished after 100 years for new generation readers : ना. सी. फडके-गोखले यांच्या ‘रत्नाकर’ मासिकाचा १९२६चा पहिला अंक मूळ रूपात; शंभर वर्षांपूर्वीच्या मराठी साहित्य, जाहिराती, चित्रकला व सांस्कृतिक-सामाजिक संदर्भांची नव्याने ओळख
The Revival of a Classic: Celebrating 100 Years of 'Ratnakar' Magazine

The Revival of a Classic: Celebrating 100 Years of 'Ratnakar' Magazine

Sakal

Updated on

मयूर भावे - mayur.bhave@esakal.com

उत्तम साहित्य हे काळाशी बांधील नसतं. त्यामुळे आताच्या पिढीला मागच्या काळातील साहित्याची ओळख होणं, त्यांच्यापर्यंत ते साहित्य पोहोचणं आवश्‍यक आहे. याच हेतूने विख्यात लेखक व कादंबरीकार ना. सी. फडके यांनी त्यांचे मित्र अनंत सखाराम गोखले यांच्यासोबत सुरू केलेल्या ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकाचा पहिला अंक आता सुनिधी पब्लिशर्सच्या वतीने पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे.

‘रत्नाकर’चा पहिला अंक ४ जानेवारी १९२६ मध्ये प्रसिद्ध झाला आणि १९३१ ला काही अकल्पित घटनांमुळे ते मासिक बंद पडलं. मात्र, दर्जेदार साहित्यामुळे या मासिकाने मराठी साहित्यविश्‍वात ‘रत्नाकरयुग’ निर्माण केलं होतं. या घटनेची शताब्दी जानेवारी २०२६ मध्ये साजरी करण्याच्या उद्देशाने ‘रत्नाकर’चा पहिला अंक मूळ स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शंभर वर्षांपूर्वीची सांस्कृतिक - सामाजिक परिस्थिती व विविध घडामोडींचं अंकात पडणारं प्रतिबिंब, ‘रत्नाकर’च्या संपादकांनी केलेली साहित्याची निवड वगैरे गोष्टी आताच्या पिढीला कळाव्यात यासाठी करण्यात आलेला हा स्तुत्य प्रयत्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com