
मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर हिंदीतील नामवंत कलाकार हा सुषमा शिरोमणीचा नेहमीच मास्टर स्ट्रोक. सुषमा निर्मित व दत्ता केशव दिग्दर्शित ‘फटाकडी’साठी जगदीश खेबूडकर लिखित ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ ही फक्कडबाज लावणी आशा भोसले यांच्या नटखट आवाजात संगीतकार बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केली. हे गाणे पडद्यावर साकारायला अदाकारा तशी विशेषच हवी. त्यासाठी सुषमा शिरोमणीने रेखाची निवड केली, त्याचा हा फ्लॅशबॅक....