

Republic Day
sakal
प्रियदर्शन saptrang@esakal.com
सत्त्याहत्ताराव्या प्रजासत्ताक दिनाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हा दिवस आपण ७७ वर्षांपूर्वी स्वतःशी केलेल्या प्रतिज्ञा पुन्हा आठवण्याचा आणि स्वतःची वर्तणूक तपासण्याचा आहे, असे वाटत नाही का? या दिवशी आपण आपली राज्यघटना स्वीकारली आणि त्यानुसार वागण्याची शपथ घेतली. ही राज्यघटना म्हणजे या देशाचा विवेक आहे, आत्मा आहे आणि त्याच वेळी देशातील बदलांना मुभा देणारी लवचीकताही त्यामध्ये आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे अशा या गोष्टीचाही उत्सव आहे, की या देशात लोकांचे राज्य आहे, लोक राज्य चालवतात. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी केलेल्या कायद्यांद्वारे हे राज्य चालते. प्रजासत्ताक दिन म्हणजे राष्ट्र म्हणून आपले स्वातंत्र्य निश्चित करणारे माध्यम आहे.