
अरविंद रेणापूरकर-arvind.renapurkar@esakal.com
भारत हा जगातील सर्वात मोठा दुचाकी वाहन बाजार म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत दुचाकी सर्वाधिक प्रमाणात विकल्या जातात. आजघडीला बहुतांश देश स्कूटर्सकडे वळत असताना, भारतीय नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात मोटरसायकलना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.