

Rohit Sharma Shubman Gill Captaincy
sakal
शैलेश नागवेकर-shailesh.nagvekar@esakal.com
चॅम्पियन्स करंडक जिंकूनही रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून कर्णधारपदावरून निवड समितीने पायउतार केले आणि शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. तिन्ही प्रकारांत एकच कर्णधार असेल तर नियोजन, संघ बांधणी आणि भविष्यातील ध्येय निश्चित करणे सोपे होते, असे स्पष्टीकरण निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिले होते. त्यांना वेगवेगळे कर्णधार ही संकल्पना मान्य नाही. असू शकतो एकाद्याचा दृष्टिकोन!