

RS Category: Defining High-Performance Driving
Sakal
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
ओबडधोबड रस्त्यांसाठी हवा असणारा दणकटपणा आणि मायलेज या स्पर्धेत ‘आरएस’ श्रेणीच्या गाड्या तंत्रज्ञान व प्रगत यांत्रिकीच्या जोरावर बाजारात क्रांती घडवत आहेत. ‘आरएस’ श्रेणी म्हणजे काय?, असा प्रश्न पडू शकतो. मात्र या श्रेणीच्या गाड्या वेगवान आणि शक्तिमान असतात. अर्थात शून्य ते शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठण्याचा कालावधी हा मॉडेल व इंजिन क्षमतेवर अवलंबून असतो; पण सरासरी पाच सेकंदांत ही वाहने शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठतात.