

Rashtriya Swayamsevak Sangh
sakal
प्रा. डॉ. राजश्री देशपांडे- editor@esakal.com
नदीचा प्रवाह जसा कितीही अडथळे आले, तरी निरंतर असतो, स्वतःची वाट शोधत आजूबाजूच्या परिसराशी असलेल्या बांधिलकीच्या भावनेतून आपले मार्गक्रमण करीत राहतो, त्या प्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल शंभर वर्षांपासून सुरू आहे. डॉ. शरद कुंटे यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एका शतकाची वाटचाल’ या आपल्या पुस्तकातून संघाच्या वाटचालीचा विविधांगी धांडोळा अत्यंत समर्पक रीतीने घेतला आहे.