माणुसकी

आपण आपले मिळालेले अधिकार गाजवतो. पण सहज मिळालेल्या माणुसकीचं काय?
humanity
humanitysakal
Updated on

परिस्थिती नुसार कधी आपुलकीचे दोन शब्द बोलायला हवे. तर कधी साध्या स्मित हास्याने समोरच्याला आपलेसे करायला हवे. न जाणो कोण कधी कुठल्या संकटाला कामी पडेल सांगता येत नाही. कुणाला कधीच कमी लेखू नये. आपण आपले मिळालेले अधिकार गाजवतो. पण सहज मिळालेल्या माणुसकीचं काय?

एका संध्याकाळी उशिराच ऑफिसची सगळी काम आटोपून मी मंदिराबाहेरील एका आळ बाजूच्या बाकड्यावर बसली होते. अंधार पडत चालला होता. वर्दळ ही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कुणाचे काही कॉल्स आले का बघावं म्हणून मोबाईल काढला बघते तर तो ही हँग झालेला. तेवढ्यात पाऊस ही सुरू झाला. पण माझा हँग झालेला मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालूच होता. पावसाच्या सरी आणखी वाढायला लागल्या. आज एक ही बस, टॅक्सी वगैरे बराच वेळ झाला तरी दिसत नव्हते म्हणून चौकशी केली तर कळलं काही कारणास्तव आज चालकांचा संप आहे.

humanity
शेतकरी कोजागरी पौर्णिमा कशी साजरी करतो, माहितेय का?

रात्री चे आठ वाजत आले होते. थोडयाच वेळात मी तिथून हाय-वे वर आली लिफ्ट मागायचे भरपूर प्रयत्न केले पण एकतर पाऊस आणि चालकांचा संप त्यामुळे कुणीच लिफ्ट देईना. तेवढ्यात कुणी तरी खांद्यावर हात ठेवला, मी दचकून मागे बघितलं तर आमच्याच ऑफिस मध्ये साफसफाई ची काम करणारी सुनीता होती. तिने आपुलकीने विचारलं," मॅडम काय झालं? एवढ्या रात्री तुम्ही इथे कशा? मी तिला घडलेली सगळी हकिकत सांगितली. तिने त्वरित आपला मोबाईल दिला आणि म्हणाली " घ्या मॅडम घरी फोन करा". आजपर्यंत माझ्या वर मोबाईल नंबर पाठ करायची वेळच आली नव्हती. त्यामुळे नीरजला सोडलं तर दुसऱ्या कुणाचाच नंबर पाठ नव्हता. मी लगेच नीरजला कॉल केला पण त्याचाही नंबर नॉट रीचेबल येत होता.

सुनीता ने लगेच विचारलं " मॅडम तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला माझ्या सायकलने घरी सोडून देते". मी म्हटलं अगं एवढा त्रास कशाला मी करेन ॲ़डजेस्ट ती म्हणाली," मॅडम खूप वेळ झाला आहे. त्यात चालकांचाही संप आहे. आज तुम्हाला घरी जायला काहीच मिळणार नाही. प्लीज ऐका चला मी सोडून देते." पाच किलोमीटर सायकल चालवून तिने मला घरी सोडलं. घरी पोहोचल्यावर मी तिला म्हटलं अगं रात्र खूप झाली आहे. थांबून जा इथेच. तर ती म्हणाली "नाही मॅडम घरी सासूबाई एकट्या आहेत. मी त्यांची औषध घेण्यासाठीच बाहेर पडली होती. मला घरी जावंच लागेल आणि तशीच ती निघाली. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मन खूप अस्वस्थ झालं.

humanity
सतत फोन वापरताय? सावधान! भेडसावतील हे आजार 

कारण, याच सुनीता ने सकाळी मला सासूबाईची तब्येत बरी नाही म्हणून सुट्टी मागितली तर मी तुमची कामे न करण्याची ही सगळी नाटक असतात, असं बोलून तिला नकार दिला होता. कधी कधी आपल्याला मोठेपणाचा एवढा अहंकार चढलेला असतो की, आपण एखाद्याला माणूस म्हणून ही बघत नाही. की कधी त्यांची अडचण जाणून घेऊन साधी चौकशी ही करत नाही. आज मलाच माझी लाज वाटत होती. म्हणूनच आल्या दिवसाला, आल्या संधीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यातल्या पूर्ण चांगुलपणाने समोर जायला हवे.

- स्वाधिनता बाळेकरमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com