Salim Khan Biography : सलीम-जावेद जोडीने बदलली हिंदी सिनेसृष्टी; पटकथालेखकांना मिळवून दिला मान आणि आर्थिक प्रतिष्ठा

Salim Khan Biography and Salim-Javed Legacy : सलीम खान यांच्या ‘सलीमनामा’मधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संघर्षाचा वेध घेतला आहे. सलीम-जावेद जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत पटकथालेखकांचा सन्मान आणि आर्थिक महत्त्व वाढवले.
Salim Khan Biography and Salim-Javed Legacy

Salim Khan Biography and Salim-Javed Legacy

esakal

Updated on: 

मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री - saptarang@esakal.com

काही व्यक्तिमत्त्वेच अशी असतात की, त्यांच्याविषयी सर्वत्र आदर व्यक्त केला जातो. हिंदी चित्रपटसॄष्टीतील असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुप्रसिद्ध पटकथाकार सलीम खान. आताच्या पिढीला सांगायचं, तर सलमान खानचे वडील. प्रगल्भ विचार, सर्जनशीलता, साधेपणा आणि कायम दुसऱ्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा स्वभाव ही सलीम खान यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये! सलीम खान यांचे आत्मचरित्रपर पुस्तक ‘सलीमनामा’ या शीर्षकांतर्गत प्रकाशित झाले आहे. पुस्तकाचे शब्दांकन केले आहे सिनेअभ्यासिका आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी.

१९७० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी क्रांती घडली. त्या क्रांतीचे नाव होते सलीम-जावेद! सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी चित्रपटलेखकांना केवळ नावच नाही, तर आर्थिक मूल्य मिळावे यासाठी संघर्ष केला. त्यांच्या यशानंतर पटकथा लेखकांच्या मानधनाबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल अधिक गंभीरपणे विचार होऊ लागला.

Loading content, please wait...