- गिरिजा दुधाट, dayadconsultancies@gmail.com
भारताच्या शस्त्रपसाऱ्यात द्वंद्वाची, लहान आकारची शस्त्रे बघितली, तर आपल्याला दिसतात अनेकानेक चाकू-सुरे! वरकरणी एखाद्याने बघितलं, तर एकसारख्या रंगरूपाने, अंगकाठीने अगदी गोंधळात पडावं इतकं देशी-विदेशी वैविध्य भारताच्या छोट्या शस्त्रांमध्ये आहे, पण या गोतावळ्यात अगदी मानाने आणि आपल्या देखण्या रूपाने वेगळी उठून दिसते ती म्हणजे, ‘कट्यार’!
अस्सल भारतीय घाटाची शस्त्रमानिनी! मराठा, शीख, राजपूत ते अगदी मुघलांसारख्या परकीय राज्यकर्त्यांनीही युद्धांपासून ते वेशभूषेपर्यंत आणि मानचिन्हांपासून ते सांस्कृतिक परंपरांपर्यंत या शस्त्राचा दिमाखाने वापर केला.