

Sambha Bhise The Boy Who Hated School
Sakal
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
‘फक्त मूर्ख मुलंच शाळेत जातात’ असं संभाचं स्पष्ट मत होतं. घराच्या दारातून सोनू आत येत संभाला झोपेतून उठवत होती. तिने त्याला आज शाळेत शिकवायला नवीन ताई येणार होत्या त्या विषयी सांगितलं आणि संभा शाळेत येणार आहे की नाही, हेही विचारलं. त्यावर संभाचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं होतं. त्याला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही. शाळेमध्ये सारखी मुळाक्षरं आणि पाढ्यांची उजळणी घ्यायचे, तसेच एका जागी न बसणाऱ्या मुलांना रागवायचेसुद्धा. संभाला असं स्थिरपणे एका ठिकाणी बसणं अजिबात रुचायचं नाही. त्याला सतत बाहेर फिरायला, हुंदडायला आवडायचं. कधी तरी तो वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा, पण बहुतेक वेळा झाडांची फळ तोडायची, ती चोरून खायची, पक्षी बघत फिरायचं, मासे पकडायचे हे उद्योग तो करायचा.