चेन्नईतला पाऊस अन् इडली-रस्सम

संजय घारपुरे sanjaygharpure@gmail.com
Sunday, 21 February 2021

अल्याड-पल्याड
भारतीय संघाचा डाव इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोलमडत होता, त्या वेळी काहींनी पावसाची आराधना समाजमाध्यमांवरून सुरू केली. ती काही चुकीची नव्हती. चेन्नईतील अनेक सामन्यांत पावसानं विघ्न आलेलं आहे.

भारतीय संघाचा डाव इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोलमडत होता, त्या वेळी काहींनी पावसाची आराधना समाजमाध्यमांवरून सुरू केली. ती काही चुकीची नव्हती. चेन्नईतील अनेक सामन्यांत पावसानं विघ्न आलेलं आहे. सन २०००-१० या दशकातील एका टप्प्यात चार वर्षांत दोन कसोटी, दोन एकदिवसीय लढती आणि राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेतील अंतिम सामन्याला पावसाचा फटका बसला होता. त्या वेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी ‘भारतानं सामन्यांचा कार्यक्रम ठरवण्यापूर्वी हवामान खात्याशी चर्चा करावी,’ अशी सूचना केली होती. त्यानंतर भारतीय मंडळाचे कार्यक्रम कसे ठरतात हा वेगळाच वाद रंगला होता ही बाब अलाहिदा.

याच वादंगाच्या धुरळ्यात चेन्नईची पोंगल कसोटीची मागणी कशी दुर्लक्षित होते आणि कशी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये पावसाच्या कालावधीत कसोटी दिली जाते याची चर्चाही झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साग्रसंगीत मेजवानी
कसोटीजगतात भलेही टी टाइम असेल; पण चेन्नईतील क्रिकेटप्रेमींसाठी तो असतो कॉफी टाइमच. ‘मद्रास’ असताना तर हमखास होता. सत्तरच्या दशकात तिथं कसोटीचे तिकीटधारक सकाळी सातपासून गेटबाहेर रांगा लावत. ही संख्या पन्नास हजारांवर असे. त्या वेळी सीटक्रमांक नसत, त्यामुळे चांगली जागा पकडण्यासाठी हा सर्व खटाटोप असे. सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत मुक्काम असेल तर मोठा डबा असायलाच हवा. कापडी पिशवीत टिफिनबरोबर कॉफी भरलेला थर्मासही असे. अर्थातच खेळ सुरू होण्यापूर्वी इडली, डोसा किंवा वडा फस्त होत असे, लंच टाइमसाठी सांबार-राईस, रसम्‌-राईस किंवा अगदीच दही-भात असे. रोज याचा कंटाळा आलाच तर लेमन राईस किंवा टोमॅटो राईसचा पर्याय होता. त्याच्या सोबत पापड, लोणचं, केळ्याची वेफर्स, पाण्याची बाटली तर हवीच. पोंगलच्या सुमारास सामना असला तर साखर-भात असे, त्याच्यावर कधी काजूही असत. या चाहत्यांचा दही-भात खास असे. सकाळी दूध-भात तयार होत असे, त्यातून ताकाचा एकच चमचा फिरवला जात असे, उपाहारापर्यत तो छानपैकी दही-भात होत असे.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

‘चिपॉक’वरील कारकीर्दीतील सर्वोत्तम 

 • वीरेंद्र सेहवाग :     ३१९
 • महेंद्रसिंह धोनी :     २२४
 • करुण नायर :     ३०३
 • केएल राहुल :     १९९
 • भारतीय संघ :     ७५९-७

मद्रास, तसंच चेन्नईतील कसोटी :

 • पंकज रॉय आणि विनू मांकड यांची पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांची भागीदारी याच मैदानात सन १९५६ मध्ये.
 • सुनील गावसकर यांनी याच मैदानावर सन १९८० च्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत ५९३ मिनिटांत १६६ धावा केल्या होत्या.
 • सन १९८२ मधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत गुंडाप्पा विश्वनाथ आणि यशपाल शर्मा यांनी दिवसभर फलंदाजी केली होती.
 • भारतातील एकमेव बरोबरीच्या कसोटीत डीन जोन्सच्या ५०३ मिनिटांत २१० धावा.
 • या मैदानावरील पूर्ण तिन्ही कसोटींमध्ये सचिनचं शतक.
 • नरेंद्र हिरवानीकडून याच मैदानावर १३६ धावांत १६ विकेट.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay gharpure Writes about Chennai Rain Cricket Chepauk Stadium