esakal | भारतीय क्रिकेट अशीही 'समानता'
sakal

बोलून बातमी शोधा

Mithali-Raj

अल्याड-पल्याड
सन १९९०, २०००, २०१०, २०२० अशी तब्बल चार दशकं ‘ती’ खेळली आहे, तिची एकंदर कारकीर्द आहे २१ वर्षं २५६ दिवसांची! या कालावधीत ‘ती’ अवघ्या २१० एकदिवसीय लढती खेळली. ही महिला खेळाडू आहे भारताची स्टार मिताली राज.

भारतीय क्रिकेट अशीही 'समानता'

sakal_logo
By
संजय घारपुरे saptrang@esakal.com

सन १९९०, २०००, २०१०, २०२० अशी तब्बल चार दशकं ‘ती’ खेळली आहे, तिची एकंदर कारकीर्द आहे २१ वर्षं २५६ दिवसांची! या कालावधीत ‘ती’ अवघ्या २१० एकदिवसीय लढती खेळली. ही महिला खेळाडू आहे भारताची स्टार मिताली राज. आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा विचार करू या.  त्याची एकदिवसीय कारकीर्द १३ वर्षं ३० दिवसांची, त्यानंतरही २८० एकदिवसीय सामने तो खेळला आहे. मिताली महिला क्रिकेटपटू असल्यामुळेच केवळ ही तफावत आहे. स्त्री-पुरुष समानतेची चर्चा होत असताना महिला क्रिकेट किती दुर्लक्षित आहे, याचं हे उत्तम उदाहरण.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका सांख्यिकी तज्ज्ञानं भारतीय क्रिकेटमधील सामन्यांच्या संख्येबाबत एक छान टिप्पणी केली होती : ‘भारतीय पुरुष क्रिकेट संघांच्या सामन्यांचा महापूर येतो, तर महिला संघाच्या आंतरराष्ट्रीय लढती दुष्काळी भागात कधीतरी पाऊस पडतो तशा होतात.’ आता कुणाला यात अतिशयोक्ती वाटेल; पण परिस्थिती दुर्दैवानं अशीच आहे. सचिन तेंडुलकर हा मितालीपेक्षा एखादं वर्ष जास्त एकदिवसीय सामने खेळला आहे; पण त्याचे सामने मितालीच्या दुप्पट आहेत. सचिनच्या एकूण कसोटी २०० आहेत, तर मितालीच्या केवळ दहा. जागतिक महिला दिनाची भेट मिळाल्यानं मिताला तब्बल सात वर्षांनी कसोटी खेळणार आहे, तीसुद्धा डिसेंबरमध्ये. भारतीय महिला क्रिकेट संघटनेचे भारतीय क्रिकेट मंडळात विलीनीकरण झाल्यावर परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती. खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं. त्यांच्या सामन्याच्या मानधनात वाढ झाली; पण सामने कुठे आहेत? आता तर कोरोनाचं कारण आहे. सर्व क्रीडास्पर्धा सुरळीत होत असताना महिला क्रिकेटला सापत्न वगणूक होती. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

कोरोनाच्या कालावधीत इंग्लंड क्रिकेट मंडळ भारताविरुद्धच्या मालिकेसाठी उत्सुक होतं. चार्टर विमान पाठवण्याची त्यांची तयारी होती, आपल्याला केवळ खेळाडूंना एका शहरात एकत्र आणायचं होतं; पण तेही जमलं नाही किंवा जमवण्याचा विचार केला गेला नाही. त्यानंतर काही दिवसांत पुरुष क्रिकेटपटूंना आयपीएलला नेण्यासाठी कंबर कसण्यात आली. त्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात गेला; पण महिला संघाचा दौरा रद्द करण्यात आला. या कालावधीत पाकिस्तानचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेला गेला आणि आपल्या महिला संघाला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचे दौरे नाकारण्यात आले.

विश्वकरंडक महिला ट्वेंटी-२० स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम लढतीस विक्रमी उपस्थिती होती, विक्रमी चाहते लाभले, तरीही भारतीय क्रिकेट मंडळास महिलांची लढत नको आहे! आता सात वर्षांनंतरच्या पहिल्या कसोटीसाठीची घोषणा करण्यासाठी जागतिक महिला दिनाची प्रतीक्षा करण्यात आली. समानतेच्या युगात हे घडत आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू कोरोनाच्या महामारीनंतर सहा मार्चपर्यंत केवळ चार सामने खेळल्या. मात्र, ‘आम्ही अन्याय करत नाही,’ हे भासवण्यासाठी भारतीय मंडळानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे आठ सामने आणि राष्ट्रीय महिला एकदिवसीय स्पर्धा एकाच वेळी घेतली.           

भारताचा वन डे सामन्यांचा दुष्काळ

 • ५१० दिवस : ता. नऊ जुलै १९९९ ते ३० नोव्हेंबर २००० (२००० च्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ५०८ दिवस एकही एकदिवसीय लढत खेळला नाही.)
 • ३९८ दिवस : ता. चार डिसेंबर २००० ते ६ जानेवारी २००२
 • ३०० दिवस : ता. सात फेब्रुवारी २००३ ते ४ डिसेंबर २००३
 • २३२ दिवस : ता.१० एप्रिल २००५ ते २७ नोव्हेंबर २००५
 • ३३६ दिवस : ता.२१ मार्च २००९ ते १९ फेब्रुवारी २०१० (यादरम्यान ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धा)
 • २३७ दिवस : ता. सात जुलै २०११ ते २९ फेब्रुवारी २०१२
 • २०४ दिवस : ता. ११ जुलै २०१२ ते ३१ जानेवारी २०१३ (विश्वकरंडक स्पर्धा असूनही सामने नाहीत)
 • ३४६ दिवस : ता. सात फेब्रुवारी २०१३ ते १९ जानेवारी २०१४ (विश्वकरंडक स्पर्धेनंतरचा दुष्काळ)
 • १९७ दिवस : ता.२३ जुलै २०१७ ते ५ फेब्रुवारी २०१८ (२०१७ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर)
 • ४८५ दिवस : ता. सहा नोव्हेंबर २०१९ ते ७ मार्च २०२१

लॉकडाऊन केवळ भारतीय महिला क्रिकेटचे

 • सप्टेंबर २०२० : इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका.
 • सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय लढती.
 • जानेवारी २०२१ : दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानविरुद्ध तीन वन-डे आणि तीन ट्वेंटी-२०.
 • फेब्रुवारी २०२१ : झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top